आणखी २५ बाधितांचा मृत्यू; दिवसभरात १ हजार ९८६ जण झाले कोरोनामुक्त
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८७५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २५ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांनी दिली.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली २६ (७९३२), कराड १९४ (२३८२१), खंडाळा ३३ (११०३०), खटाव २१० (१७४९४), कोरेगाव ५६ (१५३२७), माण ५६ (१२०४४), महाबळेश्वर १ (४१३४), पाटण ४२ (७४४२), फलटण ७६ (२७२४९), सातारा १३३ (३७०७६), वाई ४१ (११९८८) व इतर ७ (११२६) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ७६ हजार ६६३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली २ (१८१), कराड ४ (६८५), खंडाळा १ (१४१), खटाव ४ (४३४), कोरेगाव ४ (३३९), माण १ (२३३), महाबळेश्वर ० (४४), पाटण १ (१६२), फलटण ० (२६४), सातारा ६ (१११४), वाई २ (३१५) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३९१२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात १९८६ जणांना डिस्चार्ज
जिल्ह्यात आज दिवसभरात १९८६ नागरिकांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या आणखी घटली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ८७३९७५
- एकूण बाधित - १७६६६३
- घरी सोडण्यात आलेले - १५९९८०
- मृत्यू - ३९१२
- उपचारार्थ रुग्ण - १२६२९
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या