Satara News : जिल्ह्याला बंपर दिलासा; ५१०७ जणांना डिस्चार्ज


अ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्या झटक्यात खाली; दुसरी लाट ओसरण्याची आशा
  

Satara News : सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात उच्चांकी पाच हजारांहून अधिक बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या ५१०७ बाधितांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

जिल्हावासीयांसाठी ही अत्यंत दिलासादायक व उत्साहवर्धक बाब आहे. या बंपर कोरोनामुक्तीमुळे अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या झटक्यात खाली आली आहे. तसेच जिल्हावासीयांची सत्वपरीक्षा पाहणारी कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची आशा निर्माण झाली आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - ८१०४४५
  • एकूण बाधित - १६९३१४  
  • घरी सोडण्यात आलेले - १४८०५२  
  • मृत्यू - ३७३०
  • उपचारार्थ रुग्ण - १७५२९

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या