मंगळवारी ऑफलाइन सभा घेण्यास प्रशासनाचा हिरवा कंदिल; खडाजंगी होणार ?
Satara News : सातारा जिल्हा परिषदेची मंगळवार दि. १५ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन होणारी सभा आता ऑफलाइन होणार असल्यामुळे या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. १५) व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. मात्र या ऑनलाइन सभेला जिल्हा परिषद सदस्यांचा विरोध होता. काही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ऑफलाइन सभेस परवानगी देण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार प्रशासनाने ऑफलाइन सभा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ही सभा मंगळवारी होणार आहे.
बहुउद्देशीय सभागृहात आयोजन
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या सूचनेनुसार दि. १५ रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह येथे होणार असल्याची माहिती सभा सचिव व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी दिली. तीन महिन्यानंतर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होत आहे. त्यामुळे सभेत विविध विषयांवर जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या