Students Strike News : संयुक्त विद्यार्थी संघटनेचे आता ऑनलाइन आंदोलन


'#माझे_ट्विट_फीमाफीसाठी' हॅशटॅग पोहोचला १.१० लाख लोकांपर्यंत

Students Strike News : महाविद्यालयातील अनावश्यक विभागांच्या फी रद्द करण्यासाठी आणि ट्यूशन फी मध्ये ५० टक्के सवलत मिळण्यासाठी संयुक्त विद्यार्थी संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात सरकारकडून मिळत असलेल्या आश्वासनांना कंटाळून संघटनेने ऑनलाइन आंदोलन छेडले आहे. '#माझे_ट्विट_फीमाफीसाठी' या हॅशटॅगखाली सुरू झालेले हे आंदोलन पहिल्याच दिवशी १ लाख १० हजारहून अधिक लोकांपर्यंत पोहोचले आहे.

याप्रश्नी संघटनेचे पदाधिकारी गेल्या १० महिन्यांपासून विविध स्तरावर लढा देत आहेत. याबाबत सरकारकडून काहीही निर्णय होत नसल्याने दि. १० जूनपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने जाहीर केला होता. यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फी माफीसंदर्भात येत्या दोन दिवसात बैठक लावण्याचे पुन्हा आश्वासन दिले होते. परंतु बैठक लावली गेली नाही. सरकारच्या या आश्वासनांना कंटाळून '#माझे_ट्विट_फीमाफीसाठी' हे ऑनलाईन आंदोलन छेडण्यात आले. याचबरोबर संयुक्त विद्यार्थी संघटनेच्या या आंदोलनाला इतर संघटनांचा वाढता पाठिंबा आणि राज्यातील विद्यार्थी आग्रहास्तव आंदोलनाचा कालावधी दि. १४ जून रोजी रात्री ८ वाजेपर्यंत वाढवण्यात आला असून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

... तर रस्त्यावर उतरून आंदोलन

सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करून फी माफ करण्यासाठी बैठक आयोजित करावी. अन्यथा लवकरच रस्त्यावर उतरून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, अशा प्रकारे आंदोलन करायला सरकारने भाग पाडू नये, अशी विनंती संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांनी सरकारला केली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या