Dhangar Reservation News : धनगर आरक्षणप्रश्नी राज्य सरकार सकारात्मक !


हेमंत पाटील यांनी धनगर आरक्षणासंदर्भात घेतली शरद पवार यांची भेट

Dhangar Reservation News : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार धनगर आरक्षणप्रश्नी सकारात्मक आहे. येत्या काही दिवसात हा प्रश्न सुटेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला असल्याची माहिती धनगर समाज एकीकरण कमिटीचे अध्यक्ष व इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली.

हेमंत पाटील यांनी धनगर आरक्षणासंदर्भात बारामतीत गोविंद बाग येथे शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पाटील यांनी भेटीबाबतची माहिती दिली. महाविकास आघाडीचे सरकार धनगर समाजाचा आरक्षणासाठी कटिबद्ध आहे. तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरून न्यायालयाकडून नोटीस येईल, तेव्हा त्या बाबतीत महाराष्ट्र सरकार आपले योग्य ते म्हणणे न्यायालयात मांडेल, असे शरद पवार यांनी सांगितल्याचे पाटील म्हणाले. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलू. तसेच आपणही याप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा असे पवार यांनी सांगितल्याचे ते म्हणाले.

राज्यात धनगर व धनगड एकच

महाराष्ट्रात धनगर व धनगड एकच आहेत. संबंधित वकिलांची बैठक लावून कायदेशीर बाबी तपासून त्या दुरुस्त करण्यात येणार असल्याचे सूतोवाच शरद पवार यांनी केल्याची माहिती त्यांनी दिली. आपण याप्रश्नी सतत पाठपुरावा करत आहोत. याबाबतीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच संभाजी महाराज, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहे. गरज पडल्यास केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले.

Dhangar Reservation Issue : Hemant Patil - Sharad Pawar Visit

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या