मार्चपर्यंत ५० टक्के थकबाकी भरल्यास उर्वरित माफ; ... तर वीजपुरवठा होणार खंडित
Mahavitaran News : कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून कृषिपंपाच्या वीजबिलांच्या थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील १ लाख २९ हजार २४८ कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे सध्या १२१ कोटी ६ लाखांचे चालू वीजबील व ५९९ कोटी ४३ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. योजनेनुसार येत्या मार्चपर्यंत यातील ५० टक्के रक्कम व चालू वीजबील भरल्यास उर्वरित ५० टक्के थकित रक्कम माफ होणार आहे. मात्र योजनेत सहभाग नाही व चालू वीजबिलांचा भरणा नाही अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील ९० हजार ६६२ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदवला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकीपोटी ९६ कोटी ५४ लाख व चालू वीजबिलांच्या ६८ कोटी ७६ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकNयांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट असे एकूण १३५ कोटी ७१ लाख रुपये माफ झाले आहेत. यामध्ये ५१ हजार ६३३ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबील व थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा एकूण ८३ कोटी ३४ लाख रुपयांचा भरणा केला आहे. तर ६५ कोटी ७७ लाख रुपयांची अतिरिक्त सूट घेऊन संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळविली आहे.
१.८० लाख शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त होण्याची संधी
गेल्या मार्चपासून महावितरणने कृषिपंप वीज धोरण २०२० च्या अंमलबजावणीला सुरूवात केली. या धोरणातील योजनेप्रमाणे सातारा जिल्ह्यातील एकूण १ लाख ८० हजार ८८१ शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे. निर्लेखनाद्वारे महावितरणकडून मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी रक्कम वगळून या शेतकऱ्यांकडे ६६५ कोटी २० लाख सुधारित थकबाकी आहे. यातील ५० टक्के थकबाकी व चालू वीजबिलांचे १३८ कोटी ६३ लाख रुपयांचा भरणा येत्या मार्च २०२२ पर्यंत केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के रक्कम माफ होणार आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या