दगडफेक प्रकरणाच्या चौकशीची हेमंत पाटील यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी
Politics News : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापूर येथे झालेल्या कथित दगडफेक प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी धनगर समाजाचे नेते व इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. पडळकर यांनी पुरावे द्यावेत, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर हे प्रसिध्दी मिळवण्यासाठी सतत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टीकाटिप्पणी करत आहेत. सोलापूर येथे झालेल्या कथित दगडफेक प्रकरणाच्या मागे शरद पवार, अजित पवार किंवा कार्यकत्र्यांचा हात असेल पडळकर यांनी पुरावे जनतेसमोर द्यावेत, नाहीतर शरद पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी व समाजा समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी पडळकर यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी हेमंत पाटील यांनी केली आहे.
धनगर समाजाला वेठीस धरतात
गोपीचंद पडळकर सतत काही तरी खोटेनाटे करुन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, पवार कुटुंबीयांवर आरोप करत असतात आणि धनगर समाजाचा राजकीय वापर करुन समाजास वेठीस धरत असतात, असे नमूद करत, याबाबत कारवाई न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा हेमंत पाटील यांनी निवेदनात दिला आहे.
Gopichand Padalkar Vs Hemant Patil
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या