Politics News : पडळकरांच्या बगलबच्च्यांना निर्वाणीचा इशारा


धमक्यांना घाबरून घरात बसून राहणार नाही, तर घरात घुसून मारू

Politics News : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांना अत्याचार करण्याची धमकी देणाNया पडळकरांच्या बगलबच्च्यांचा युवती सेलच्या प्रदेश सचिव स्मिता देशमुख यांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. पक्षाने आम्हाला ताकद दिली आहे, ती अन्याय - अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी दिली आहे. त्यामुळे धमक्यांना घाबरून आम्ही घरात बसून राहणार नाही, तर घरात घुसून मारू, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे.

सातारा येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी युवती सेलच्या जिल्हाध्यक्ष पूजा काळे, प्राची कांबळे यांच्यासह युवती उपस्थित होत्या. सक्षणा सलगर यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून अत्याचार करण्याची धमकी दिली व अश्लील भाषा वापरली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील युवती पेटून उठलेल्या आहेत, असे देशमुख म्हणाल्या.

असले घाणेरडे प्रकार त्वरित थांबवा

आमदार गोपीचंद पडळकर हे प्रसिध्दी मिळवण्यासाठी वारंवार शरद पवार यांच्याविषयी बोलत आहेत. त्यांना आमचे सांगणे आहे, की त्यांनी जे कुत्रे सोडले आहेत, त्या बगलबच्च्यांकडून जे प्रकार सुरू आहेत, एखाद्या महिलेला घाणेरड्या भाषेत बोलले जात असेल, तर ते थांबवा. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाघीणी आहोत. आम्ही मागे हटणार नाही. घरात घुसून मारू. तेवढी आमच्यात ताकद आहे. पक्षाने आम्हाला तेवढी ताकद दिली आहे, अशा संतप्त शब्दात देशमुख यांनी खडसावले.

... नाहीतर सातारी स्टाईल दाखवू

कोणीही उठावे सुटावे आणि आम्हाला अश्लील भाषेत बोलावे, धमक्या द्याव्यात आणि त्या धमक्यांना घाबरुन आम्ही घरात बसू असे अजिबात होणार नाही. आम्ही अजिबात गप्प बसणार नाही, असे सांगून त्या म्हणाल्या, महाविकास आघाडीच्या राज्यात संपूर्ण महाराष्ट्रातील महिला सुरक्षित आहेत. आमचे सरकार, आमची पोलीस यंत्रणा आमच्यासोबत आहे. त्यामुळे असले धंदे पहिल्यांदा थांबवा. नाहीतर सातारी स्टाईलने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

Gopichand Padalkar Vs Sakshana Salgar

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या