अनेक गावे अंधारात; वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याची सरपंच परिषदेची मागणी
Satara News : वीज वितरण कंपनीने वीज तोडल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमधील रस्ते अंधारात आहेत. हा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा या मागणीसाठी सरपंच परिषद या संघटनेतर्पेâ साताऱ्यात कंदिल मोर्चा काढण्यात आला. ग्रामपंचायतीची तोडलेली वीज पुन्हा जोडली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.
ग्रामपंचायतींच्या हद्दीमधील रस्त्यांवर सार्वजनिक वीज पुरवठा केला जातो. हे बील पूर्वी शासनाकडून भरले जायचे. २०१२ पासून शासनाने हे वीजबिल भरणे बंद केले असल्यामुळे त्याची थकबाकी प्रचंड प्रमाणात वाढली. ही थकित बिले लाखोंच्या घरात आहेत. ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातून ही बिले भरणे शक्य नसल्याने ग्रामपंचायती हतबल आहेत.
गावात विकासकामे करायची कशी?
राज्य शासनाने १५ व्या वित्त आयोगातून वीजबिल भरण्यास परवानगी दिली असली तरीदेखील या वित्त आयोगातून मिळणारे सर्व पैसे वीजबिलांची थकबाकी भरण्यास वापरले तरी ग्रामपंचायतींवर वीजबिलांचा बोजा कायम राहणार आहे. तसेच विकासकामांसाठी जो निधी आला आहे, तो निधी अशा पद्धतीने वीजबिले भरण्यासाठी वापरला, तर प्रत्येक गावामध्ये विकासकामे कशी करायची, हा प्रश्न निर्माण होणार आहे.
अशा स्थितीत थकित वीजबिलापोटी वीज कंपनीने प्रत्येक गावातील सार्वजनिक वीज पुरवठा पूर्णपणे बंद केल्याने गावागावांमध्ये अंधार पसरला आहे. या पाश्र्वभूमीवर सरपंच परिषदेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथील पोवई नाक्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर कंदिल मोर्चा काढण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात असतानाच पोलिसांनी कोविडचे कारण पुढे करून मोर्चा अडवला. मोर्चात केवळ पंचवीस लोकांनाच परवानगी आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मोर्चा काढता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तोडलेली वीज पुन्हा जोडावी, अशी मागणी केली. वीज जोडणी पुन्हा केली नाही तर आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनामध्ये सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष आनंद जाधव, उपाध्यक्ष अरुण कापसे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोकळे, सचिव संजय शेलार, समन्वयक महेश गाडे, महिला समन्वयक अरुणा जाधव, सचिव शत्रुघ्न धनावडे यांच्यासह तालुका पदाधिकारी व सरपंच सहभागी झाले होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या