जिल्ह्यातील १३ रूग्णालयांना लाखोंचे जनसेट नाममात्र १ रूपया भाडेतत्त्वावर
Satara News : महाराष्ट्रातील नामवंत व सातारचा अग्रणी उद्योग कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि. यांनी सामाजिक दायित्वाची परंपरा कायम ठेवत कोविड महामारीच्या राष्ट्रीय संकटात शासनाला परत एकदा मदतीचा मोठा हात दिला आहे. जिल्ह्यातील १३ शासकीय रूग्णालयांमध्ये उभारलेले ऑक्सिजन प्लांट अखंडित सुरू रहावेत यासाठी कूपर समूह लाखो रुपयांचे जनसेट नाममात्र १ रूपया भाडेतत्त्वावर देणार आहे. या नाममात्र भाडेतत्त्वाच्या करारावर शासनाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण व कूपर उद्योगाचे सर्वेसर्वा फरोख कूपर यांनी नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या. फरोख कूपर यांच्या या दातृत्वभावनेला जिल्हावासीयांनी सॅल्यूट केला आहे.
कोविडच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजना आखल्या आहेत. त्याचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील वीस ग्रामीण रुग्णालयांमध्ये पी. एस. ए. ऑक्सिजन प्लांट बसवण्यात येत आहेत. या ऑक्सिजन प्लांटला विद्युत पुरवठा खंडित झाल्यास बॅकअप पावर म्हणून जनसेटची गरज असते, जेणेकरुन ऑक्सिजन पुरवठा खंडित होणार नाही. यासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी वूâपर कॉर्पोरेशन प्रा. लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक फरोख कूपर यांना जिल्ह्यातील १३ ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयांसाठी १०० व १६० केव्हीओ रेटिंगचे डिझेल जनरेटर सामाजिक दायित्व योजनेअंतर्गत देण्याची विनंती केली. त्यानुसार 'सबसे उपर कूपर' या उक्तीला सार्थ ठरवत फरोख कूपर यांनी फक्त नाममात्र १ रूपया भाडेतत्वावर लाखो रुपयांचे जनसेट वापरासाठी संमती दिली.
लवकरच सर्व जनित्रे होणार कार्यान्वित
या प्रकल्प अंतर्गत कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि. ने विविध ऑक्सिजन प्लांटसाठी फलटण उपजिल्हा रुग्णालय तसेच कोरेगाव, काशिळ, मेढा, दहिवडी, वडूज, औंध, सोमर्डी, उंडाळे, गोंदवले, पिंपोडे, कलेढोण व पुसेगाव येथील ग्रामीण रुग्णालयांसाठी कूपर नामांकित विद्युत जनित्रे उभारणीस सुरुवात केली आहे. काशिळ येथील १६० केव्हीओ विद्युत संच व ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटनही करण्यात आले. मेढा, कोरेगाव, फलटण व कलेढोण येथील ऑक्सिजन प्लांटसाठी वूâपर जनसेट रुग्णालयस्थळी पोचले आहेत व उभारणीचे काम सुरू आहे. लवकरच सर्व विद्युत जनित्रे कार्यान्वित होतील. ऑक्सिजन क्षमता वाढवून जिल्हा प्रशासन कोरोनाची पुढील लाट आल्यास ती थोपवण्यासाठी खंबीरपणे सज्ज झाले आहे.
जनसेटची देखभालही ‘कूपर’ करणार
आणखी महत्त्वाचे म्हणजे जिल्हा रुग्णालयाला विद्युत संचाचा नुसता पुरवठा नव्हे तर वापराच्या कालावधीत त्यांची देखभाल कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि. स्वखर्चाने करणार आहे. या करारानुसार संबंधित विद्युत जनित्र संच चालविण्याची पूर्ण जबाबदारी संबंधित रुग्णालयाकडे राहणार आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले आहे, तर बांधकाम खात्यातील विद्युत विभागाचे अभियंते एम. आर. शिंदे, नितिन शिंदे, पी. एस. शिवदास व विविध रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे.
उद्योगपती फरोख कूपर यांनी नैसर्गिक अथवा राष्ट्रीय आपत्ती असो, त्या त्या वेळी मोलाचे योगदान दिले आहे. तसेच गेल्या दिड वर्षात कोरोना लढ्यात जिल्हा प्रशासनास सर्वतोपरी मदत करुन आपण खरे कोविड वॉरियर आहोत हे सिध्द केले आहे. जिल्ह्यात मदत करत असतांना रुबी हॉल क्लिनिकच्या मदतीने कंपनीतील सुमारे ३ हजार अधिकारी, कर्मचारी व कामगार यांचे लसीकरण पूर्ण करुन मानाचा टप्पा गाठला आहे. कामाच्या ठिकाणी लसीकरणाची सोय करणारी कूपर ही पहिलीच कंपनी आहे.
इतरांकडूनही अशाच भरीव मदतीची अपेक्षा !
'फरोख कूपर आणि कूपर कॉर्पोरेशनने केलेली मदत ही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उल्लेखनीय बाब असून भविष्यात अन्य घटकांकडून अशाच भरीव मदतीची अपेक्षा आहे.'- शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या