नागठाणे येथील खुनाचा गुन्हा सहा तासात उघड; आरोपी जेरबंद
Satara News : सातारा तालुक्यातील नागठाणे येथे एका महिलेचा खून झाल्याचे निदर्शनास आल्याने गावात खळबळ उडाली. मालन बबन गायकवाड (वय ५५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, बोरगाव पोलिसांनी कौशल्याने तपास करून अवघ्या सहा तासात हा गुन्हा उघडकीस आणला. संबंधित महिलेला असलेल्या दारूच्या व्यसनामुळे चिडून तिच्या पतीनेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले असून त्याला अटक करण्यात आली आहे.
नागठाणे येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेसमोर असलेल्या चाळीतील एकाखो लीत हा खून झाल्याचे मंगळवारी सकाळी निदर्शनास आले. या घटनेची माहितीमि ळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या. घटनास्थळी ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला.
पतीने दिली खुनाची कबुली
त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सागर वाघ, वर्षा डाळिंबकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळावरील परिस्थितीची पाहणी करुन व आजुबाजुच्या लोकांकडे चौकशी केली असता मयत मालन बबन गायकवाडव तिचा नवरा बबन बाबुराव गायकवाड (वय ६०) यांच्यात सतत भांडण होत असल्याचे समजले. याबाबत बबन गायकवाड यांच्याकडे तपास केला असता त्याने खुनाची कबुली दिली. पत्नी मालनला दारूचे व्यसन होते. ते मला आवडत नव्हते. काल रात्री ती दारु पिल्याने आमच्यात जोरात भांडण झाले. त्यावेळी मी तिला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे त्याने सांगितले. या गुन्ह्यात त्याला जेरबंद करण्यात आले आहे.
घरात सापडला अवैध. दारुसाठा
दरम्यान, या गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळाची पाहणी करत असताना घरामध्ये पत्र्याच्या पेटीत मनोरंजन संत्रा नावाचे लेबल असलेल्या ९० मिलीच्या ३०० दारुच्या बाटल्या मिळून आल्या. या दारुच्या बाटल्यांबाबत आरोपी बबन बाबुराव गायकवाड याच्याकडे तपास केला असता त्याने या दारुच्या बाटल्या अविनाश अरविंद साळुंखे (रा. नागठाणे) याने घरात ठेवल्या असल्याचे सांगितले. त्याबाबत अविनाश अरविंद साळुंखे याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.
या संपूर्ण कारवाईत डॉ. सागर वाघ, वर्षा डाळिंबकर यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल राकेश देवकर, धनंजय जाधव, पोलीस नाईक राजू शिखरे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल जाधव, प्रकाश वाघ, अमित पवार, शीतल शिंदे यांनी केली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या