पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा १० टक्क्यांवर; दिवसभरात १०७३ जणांना डिस्चार्ज
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८८६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा १० टक्क्यांच्या वर गेला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज दिवसभरात १०७३ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
कराड व सातारा तालुक्यातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती अद्यापही भयावह असून त्याबाबत प्रशासन गांभीर्याने उपाययोजना करताना दिसत नाही. त्यात लसीकरणही संथ गतीने सुरू आहे. दुसरी लस देताना प्राधान्य दिले जात आहे. तथापि, अद्याप ज्यांना पहिलीच लस मिळालेली नाही, त्यांचा विचार होताना दिसत नसल्याने त्यांच्यात नाराजीची भावना आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली २९ (९१३०), कराड २२० (३३१५५), खंडाळा ४४ (१२६६६), खटाव ५३ (२१०९४), कोरेगाव ६४ (१८३७६), माण ७४ (१४२०८), महाबळेश्वर ३ (४४४९) पाटण ३६ (९३८७), फलटण ९५ (२९९४६), सातारा १८१ (४३९२५), वाई ८० (१३८८०) व इतर ७ (१५७४) याप्रमाणे आजअखेर एकूण २ लाख ११ हजार ७९० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ० (१९१), कराड ० (९९३), खंडाळा ० (१६०), खटाव ३ (५०३), कोरेगाव ०(३९६), माण ० (२९१), महाबळेश्वर ० (८५), पाटण ० (३१६), फलटण २ (४९४), सातारा १ (१२९५), वाई २ (३१५) व इतर ० (७१) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ५११० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - १३०४५५१
- एकूण बाधित - २११७९०
- घरी सोडण्यात आलेले - १९८८०५
- मृत्यू - ५११०
- उपचारार्थ रुग्ण - ९९६७
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या