बोंडारवाडी येथे बंधारा नव्हे, तर धरण होणार - आमदार शिवेंद्रराजे भोसले
Satara News : बोंडारवाडी धरण हे पूर्वीच्याच धरण रेषेच्यावर होणार आहे. ग्रामस्थांचा विरोध न होता त्या ठिकाणी धरणरेषा निश्चित करुनच प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. बोंडारवाडी येथे बंधारा नव्हे, धरण होणार आहे. त्यामुळे कृती समितीने ५४ गावांमधील जनतेत गैरसमज निर्माण करु नये, असे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे.
आमदार शिवेंद्रराजे पत्रकार परिषदेत बोलत होते. पाणी पिण्यासाठी व भविष्यात शेतीसाठी वापर व्हावा यासाठी धडपड आहे. त्यामुळे कृती समितीने कोणतेही गैरसमज न करता धरण होण्यासाठी प्रयत्न करावा. मी माझ्या पध्दतीने या अधिवेशनात याबाबत आवाज उठवून प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी भूमिका मांडणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पडद्यामागचे राजकारण थांबवा
ज्यांना बोंडारवाडी धरणाचे पडद्यामागून राजकारण करायचे आहे त्यांनी राजकारण थांबवावे. बोंडारवाडी धरणाच्या उभारणीकरिता भूतकाळात झालेल्या बैठकात मला डावलले गेले. मात्र जावलीचे बोंडारवाडी धरण हाच केंद्रबिंदू मानून मी सदैव प्रयत्नशील आहे. कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांच्याशी चांगले संबंध असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणताही दुजाभाव होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी मेढ्याचे नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, उपनगराध्यक्षा कल्पना जवळ, ज्ञानदेव रांजणे, रामभाऊ शेलार, दत्ता पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या