Satara News : जिल्ह्यात रूग्णवाढ चिंताजनक; मृत्युचेही थैमान


चोवीस तासात ११६२ पॉझिटिव्ह; कराड तालुक्यात निघाले ३५० बाधित

Satara News : सातारा जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रूग्णसंख्या हजारपार गेली असून त्यामध्ये एकट्या कराड तालुक्यातील साडेतीनशे रूग्ण आहेत. काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ११६२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सातारा ८, खटाव व फलटण तालुक्यातील प्रत्येकी ७ जणांचा समावेश आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली २५ (८८३३), कराड ३५० (३०३७९), खंडाळा ७१ (१२१५१), खटाव ७७ (२०२७५), कोरेगाव ११४ (१७५५३), माण ६७ (१३५५५), महाबळेश्वर १४ (४३६९), पाटण ४७ (८९४८), फलटण ९८ (२९००४), सातारा २०५ (४१९५०), वाई ७८ (१३१९३) व इतर १६ (१४५०) याप्रमाणे आजअखेर एकूण २ लाख १ हजार ६६६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली १ (१८३), कराड ३ (९०६), खंडाळा १ (१५४), खटाव ७ (४७५), कोरेगाव २ (३८३), माण १ (२८४), महाबळेश्वर ० (८४), पाटण २ (३०१), फलटण ७ (४७७), सातारा ८ (१२४६), वाई ० (३०४) व इतर १ (७१) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४८६८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या