Satara News : एलसीबीकडून खंडाळ्यात दोन अट्टल चोरटे जेरबंद


वाई, खंडाळा तालुक्यात घरफोड्या; चार गुन्हे केल्याची दिली कबुली

Satara News : वाई, खंडाळा तालुक्यात घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांनी चार गुन्हे केल्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्या चोरट्यांना खंडाळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अकेला उर्फ अखिलेश टिमटिम्या भोसले, उमेश उर्फ उम्या इंजिन पवार (दोघे रा. खंडाळा) अशी त्या दोन चोरट्यांची नावे आहेत.

जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी उघडकीस न आलेल्या जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक धुमाळ यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व आनंदसिंग साबळे यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार केले.

घरफोड्यांच्या गुन्ह्यांची कबुली 

खंडाळा परिसरात राहणाऱ्या पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांनी खंडाळा व वाई तालुक्यातील घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत, अशी माहिती खास खबऱ्याकडून मिळताच त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना किशोर धुमाळ यांनी या पथकास दिल्या. त्या पथकाने खंडाळा परिसरात जावून अकेला भोसले, उमेश पवार या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी व विचारपूस केली असता त्यांनी खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या, वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ घरफोडी, भुर्इंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ घरफोडी असे चार घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, हवालदार कांतिलाल नवघणे, संतोष सपकाळ, संतोष पवार, पोलीस नाईक शरद बेबले, मंगेश महाडिक, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, अर्जुन शिरतोडे, निलेश काटकर, केतन शिंदे, विशाल पवार, विक्रम पिसाळ, रोहित निकम, विजय सावंत, गणेश कचरे यांनी ही कारवाई केली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या