Satara News : जिल्ह्यात मृत्युसत्राने थरकाप; आणखी ३२ दगावले


नवे बाधित ७९०; खाली आलेली अ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्या पुन्हा गेली ११ हजारांवर
 

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ७९० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात १२० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

खाली आलेली अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या पुन्हा ११ हजारांवर गेली आहे. कराड तालुक्याला कोरोनाचा मोठा फटका बसला असून बाधितांची व मृतांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ४३ (८७००), कराड २४३ (२८८८५), खंडाळा ३४ (११९७४), खटाव ३८ (१९८७१), कोरेगाव ८८ (१७११८), माण २७ (१३३०७), महाबळेश्वर ६ (४३०६), पाटण ४१ (८६९९), फलटण ६७ (२८६६५), सातारा १६० (४१११२), वाई ३३ (१२८४०) व इतर १० (१३८०) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ९६ हजार ८५७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली १ (१९७), कराड ७ (८४६), खंडाळा ० (१५२), खटाव २ (४९८), कोरेगाव ५ (३८९), माण १ (२६४), महाबळेश्वर ० (४५), पाटण २ (२०५), फलटण ४ (२८७), सातारा ६ (१२५९), वाई ४ (३४०) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४४८२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - १११५११४
  • एकूण बाधित - १९६८५७
  • घरी सोडण्यात आलेले - १८२६७७
  • मृत्यू - ४४८२
  • उपचारार्थ रुग्ण - ११०७५

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या