तीन तपांच्या लढ्याचा जय; केंद्राच्या मान्यतेनंतर राजपत्रात उमटली मोहर
Satara News : कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक या गावाच्या जयपूर या नामांतरास प्रदीर्घ प्रयत्नानंतर यश मिळाले आहे. यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे विशेष प्रयत्न कामी आले.
रहिमतपूर - औंध या रस्त्यावर असलेल्या न्हावी बुद्रुक या गावाचे नाव जातिवाचक असल्यामुळे ते बदलून जयपूर करावे, अशी मागणी गावचे सरपंच, जयपूर नामांतर समिती तसेच ग्रामस्थांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली होती. नामांतराचा प्रस्ताव तयार करणे व पाठपुरावा करण्याचे काम नंदकुमार माने, अशोक माने, विकास निकम, धनाजी फडतरे, विष्णुदास सुर्वे, तानजी साळुंखे, शंकर कोकीळ, महेश दळवी, गणेश फडतरे व संदीप निकम या जयपूर नामांतर समितीच्या सदस्यांनी ग्रामस्थांच्या पाठिंब्याने पूर्ण केले.
खासदार पाटील यांचा सत्कार
हा प्रस्ताव सातारचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय व महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावास केंद्रीय गृह मंत्रालयाकडून १९ मे २०२१ रोजी मान्यता मिळून न्हावी बुद्रुक या गावचे नाव बदलून जयपूर करण्यात आले. याबाबत दि. २३ जून रोजी महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध झाले. न्हावी बुद्रुक गावचे नाव बदलून जयपूर झाल्याची व अथक प्रयत्नांना यश मिळाल्याची माहिती खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली. यावेळी जयपूरच्या सरपंच प्रियंका माने, नामांतर समिती, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, विविध मंडळे, ग्रामस्थांतर्पेâ खासदार श्रीनिवास पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
लग्न जमवताना यायच्या अडचणी
काही वर्षापूर्वी गावाच्या नावामुळे लग्नकार्य जमवताना अडचणी येत होत्या. त्यामुळे सुमारे पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी न्हावी बुद्रुक गावाचे नाव बदलण्यात यावे असा सूर काही ग्रामस्थांकडून निघाला. अनेकदा चर्चा झाल्यानंतर गावाला 'जयपूर' नाव द्यावे असा एक सूर निघाला. त्यानंतर नाव बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या. अखेर जयपूर नावाची शासकीय कागदपत्रावर मोहोर उमटली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या