Satara News : सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध जारी


फक्त अत्यावश्यक असलेली दुकाने ९ ते २ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी

Satara News : सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शिथिल केलेला लॉकडाऊन पुन्हा कडक करण्यात आला आहे. यानुसार अत्यावश्यक बाबींची दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत, तर औषध दुकाने सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. त्याचवेळी रूग्णालयांमधील औषधांची दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र, अत्यावश्यक नसलेली दुकाने पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहेत.

कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी 'ब्रेक द चेन' अंतर्गत जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दि. ३ जुलैपासून पुढील आदेश होईपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यामध्ये सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सायंकाळी ५ ते सकाळी ५ वाजेपर्यंत तसेच आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार व रविवार पूर्ण कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वैध कारणाशिवाय कोणासही संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मॉल, सिनेमागृह बंदच; हॉटेलची फक्त पार्सल सेवा

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहतील. तथापि, वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग कोर्सेस सुरू ठेवण्यास परवानगी असेल. जिल्ह्यातील सेतू केंद्र, आधार केंद्र, चार्टर्ड अकौंटंट कार्यालये या आस्थापनांना सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत शैक्षणिक साहित्य घरपोच पुरविण्यासाठी परवानगी राहील. मॉल, सिनेमागृहे,  नाट्यगृहे इत्यादी पूर्णपणे बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंटस् ही केवळ पार्सल घरपोचसाठी सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. या ठिकाणी बसण्यासाठी परवानगी नाही. लॉजिंग सुविधा पूर्णपणे बंद राहील. बार, परमिटरुम व वाईन शॉप इत्यादीबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या