Satara News : शहरी भागात आता ऑन द स्पॉट लसीकरण बंद


सातारा, कराड, फलटण व वाईत ऑनलाइन नोंदणीनुसारच लसीकरण होणार

Satara News : सातारा जिल्ह्यात सातारा, कराड, फलटण व वाई या फक्त शहरी भागातील कोविड १९ लसीकरण सत्र यापुढे १०० टक्के ऑनलाइन नोंदणीनुसारच घेण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे या शहरी भागातील लाभार्थींना ऑन द स्पॉट पध्दतीने लसीकरण करण्यात येणार नाही, असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.  

जिल्ह्यात कोविड १९ च्या अनुषंगाने दि. १० अखेर पहिला डोस ७ लाख ७३ हजार ७६८ लोकांनी लसीकरणाचा पहिला, तर २ लाख ८ हजार ५०५ एवढ्या लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. याप्रमाणे एकूण ९ लाख ८२ हजार २७३ एवढ्या लाभार्थ्यांनी कोविड १९ लसीकरण डोस घेतला आहे. जिल्ह्यातील संपूर्ण पात्र लाभार्थ्यांना नियोजनबध्द लसीकरण करण्यासाठी जिल्हास्तरावरुन योग्य नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये लस उपलब्धतेनुसार दररोज दुपारी १२ वाजता लसीकरण सत्र https://selfregistration.cowin.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत.

संकेतस्थळावर नोंदणी करावी 

दि. १३ पासून लस उपलब्धतेनुसार सातारा, कराड, फलटण व वाई या शहरी भागातील लाभार्थींनी उपरोक्त संकेतस्थळावर जावून आपली नोंदणी करुनच लसीकरण करायचे आहे. या तालुक्यातील ग्रामीण भागातील लसीकरण सत्र ऑन द स्पॉट पध्दतीनेच सुरु राहील, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या