तयारीला लागण्याचे पदाधिकारी व शिवसैनिकांना प्रा. बानुगडे - पाटील यांचे आवाहन
Satara News : सातारा नगरपालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी महत्त्वाची आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावरुन हालचाली सुरु असून यादृष्टीने सातारा शहरातील शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी कामाला लागावे, अशा सूचना शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे - पाटील यांनी दिल्या.
सातारा येथे आयोजित पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा उपप्रमुख सचिन मोहिते, शहरप्रमुख निलेश मोरे आदी उपस्थित होते.
विकास कामांची माहिती पोहोचवा
शिवसैनिकांनी ज्या काही अडचणी असतील त्या पदाधिकारी यांच्याकडे सांगाव्यात. त्या नक्कीच सोडवल्या जातील. प्रत्येक शिवसैनिक व पदाधिकारी यांनी नगरपालिकेतील शेवटच्या मतदारापर्यंत संपर्क करुन सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन प्रा. बानुगडे - पाटील यांनी यावेळी केले.
लवकरच वॉर्डनिहाय बैठका
शहरात लवकरच वॉर्डनिहाय बैठका घेऊन पुढील रणनिती ठरवली जाणार आहे. शिवसेना स्वबळावर सातारा नगरपालिका निवडणूक लढवणार आहे, असे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे म्हणाले. यावेळी अतिश ननावरे, अनिल गुजर, रुपा लेंभे, मंजिरी सावंत आदी उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या