Satara News : नागठाणे येथे महिलेचा खून; गावात खळबळ


बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; घटनास्थळी ठसेतज्ञांना केले पाचारण
 

Satara News : सातारा तालुक्यातील नागठाणे येथे एका महिलेचा खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. नागठाणे येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेसमोर असलेल्या चाळीतील एका खोलीत ही घटना घडली. मालन बबन गायकवाड (वय ५५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.    

या घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर व पोलीस कर्मचाNयांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या. घटनास्थळी ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. ऐन आषाढी एकादशीच्या दिवशीच खुनाची घटना उघडकीस आल्याने नागठाणे गावात एकच खळबळ उडाली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या