कराड तालुक्याचे टेन्शन कायम; अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या पुन्हा दहा हजारांवर
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८१४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात ६७६ जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या पुन्हा एकदा दहा हजारांच्या वर गेली आहे.
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसला आणि अध्यक्ष - उपाध्यक्षांची निवड झाली, पण या निवडणूक उत्सवाची जबर विंâमत कराड तालुक्याला मोजावी लागत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. निवडणूक काळापासून वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप नियंत्रणात आला नसून मृत्युचे प्रमाणही वाढले आहे. त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली २१ (८९२४), कराड ३१६ (३११९३), खंडाळा २९ (१२२६९), खटाव ३४ (२०४५९), कोरेगाव ६८ (१७८२०), माण २९ (१३६८४), महाबळेश्वर ५ (४३९५), पाटण २० (९१२८), फलटण ६९ (२९२५१), सातारा १७१ (४२४६५), वाई ३६ (१३३४९) व इतर १६ (१४९०) याप्रमाणे आजअखेर एकूण २ लाख ४ हजार ४२७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ० (१८५), कराड ५ (९२५), खंडाळा १ (१५६), खटाव १ (४८८), कोरेगाव २ (३८६), माण २ (२८८), महाबळेश्वर १ (८५), पाटण १ (३०६), फलटण ४ (४८४), सातारा ६ (१२६०), वाई ० (३०६) व इतर ० (७१) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४९४० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - १२०१५०७
- एकूण बाधित - २०४४२७
- घरी सोडण्यात आलेले - १९११५३
- मृत्यू - ४९४०
- उपचारार्थ रुग्ण - १००५०
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या