दि. ७ ऑगस्टला मतदान, ८ ऑगस्टला मतमोजणी; राजकीय हालचालींना वेग
Satara News : कोरोनाचे जीवघेणे संकट असतानाही निवडणुकांचा ‘उत्सव’ सुरूच आहे. कृष्णा कारखान्यापाठोपाठ आता माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. माण बाजार समितीची सत्तासूत्रे कुणाकडे राहणार याचा फैसला करण्यासाठी ७ ऑगस्ट रोजी मतदान, तर ८ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जोरबैठकांना सुरुवात झाली आहे.
या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार दि. ६ जुलै रोजी सकाळी अकरापासून १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल करता येतील. दि. १३ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर वैध अर्जांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येईल. १४ रोजी सकाळी ११ ते २८ जुलै रोजी दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेता येतील.
राजकीय घडामोडी झाल्या गतीमान
दि. २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करुन चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास ७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान घेण्यात येईल. मतदानाचे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ पासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मतमोजणीचे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून तालुक्यात सत्तासंघर्ष पेटणार आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या