अपशब्द वापरल्याच्या कारणातून कृत्य; सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल
Satara News : अपशब्द वापरल्याचे कारण पुढे करत जिल्हा रुग्णालयात गोंधळ घालत त्या ठिकाणच्या साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तृतीयपंथीयांसमवेत पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी काही तृतीयपंथी एका सहकाऱ्यावर उपचार करुन घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेले होते. याठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांनी अपशब्द वापरल्याचे कारण करत त्या तृतीयपंथीयांनी गोंधळ घालत जिल्हा शल्य चिकित्सकांचे दालन गाठले. याठिकाणी गोंधळ घालत त्या तृतीयपंथीयांनी संबंधित डॉक्टरास माफी मागण्यास भाग पाडले होते. या प्रकारामुळे वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते.
शासकीय कामात अडथळा
याप्रकरणी डॉ. प्रकाश शिवाप्पा पोळ (रा. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. यात आर्या पुजारी, हिना पवार तसेच तिच्यासोबतच्या तीन तृतीयपंथीयांनी मारहाण करत वैद्यकीय साहित्याची तोडफोड केली. यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात गोंधळ घालत पुन्हा शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद केले आहे. यानुसार पाच जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या