टोकियो ऑलिंपिकसाठी निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी केला विशेष सत्कार
Satara News : टोकियो ऑलिंम्पिककरिता हिंदुस्थान संघातून धनुर्विद्या क्रीडाप्रकारासाठी सातारा जिल्ह्यातील सरडे (ता. फलटण) येथील प्रविण रमेश जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या आई-वडिलांचे अभिनंदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या अथक परिश्रमांमुळे व प्रोत्साहनामुळेच प्रविण जाधव यांनी उच्चतम कामगिरी करुन जिल्ह्याचा गौरव संपूर्ण देशामध्ये वाढविला असल्याचे प्रशंसोद्गार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी काढले. जाधव कुटुंबियांच्या अडीअडचणीबाबत त्यांनी चर्चा केली व संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
सेल्फी पाँईटचे केले उद्घाटन
टोकियो ऑलिंम्पिककरिता निवड झालेल्या हिंदुस्थानी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता तयार करण्यात आलेल्या सेल्फी पाँईटचे उद्घाटन प्रविण जाधव यांचे पालक व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, सातारा जिल्हा आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष आबासाहेब जाधव, सचिव चंद्रकांत भिसे, शिक्षक विकास भुजबळ, मोहन पवार व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या