जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन; उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara News : कराड तालुक्यातील उंब्रजजवळ उत्तरमांड नदीपात्रातून जेसीबी व दोन टिपरच्या सहाय्याने उत्खनन करून सात ब्रास वाळू चोरून नेल्याप्रकरणी कोर्टी (ता. कराड) येथील गणेश मुकुटराव थोरात याच्याविरोधात उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शिवडे येथील तलाठी पद्मभूषण शंकरराव जाधव (वय ४८) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता उत्तरमांड नदीच्या पात्रात ब्रिटिशकालीन बंधाऱ्याजवळ उत्खनन करून वाळू चोरल्याचे निदर्शनास आले. वाळू उत्खनन सुरू असताना ज्यांनी पाहिले, त्यांनी संबंधितास हटकले असता हायवेचे काम सुरू असल्याचे उत्तर देऊन त्याने जेसीबी व टिपरसह काढता पाय घेतला.
प्रत्यक्षदर्शींनी दिली माहिती
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी केली असता गणेश थोरात याने वाळू चोरी केल्याचे समजले. त्यानुसार उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याचे तलाठी जाधव यांनी सांगितले. पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक असिफ जमादार करत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या