Satara News : 'माय ग्रीन मसूर' समुहातर्फे वृक्षारोपण


समाजहित जोपासणाऱ्या माणसातील ईश्वराला ओळखायला शिका - पोतदार

Satara News : देव हा विविध रूपात आपल्या अवतीभोवतीच वावरत असतो. तो जसा संकटकाळात धावून येत असतो, तसा समाजाच्या हिताचा विचार करून समाजासाठी सतत काही विधायक काम करत असतो. या माणसातील ईश्वराला ओळखायला शिका, असे विचार प्रसिद्ध ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांनी मसूर (ता. कराड) येथे व्यक्त केले.

मसूर येथील निवृत्त पोलीस उपअधीक्षक दिलीप जगदाळे यांच्या पुढाकाराने 'माय ग्रीन मसूर' ग्रूपच्या माध्यमातून मसूर पोलीस दूरक्षेत्रच्या शेजारील मैदानात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात पोतदार बोलत होते. यावेळी कोयना दूध संघाचे चेअरमन वसंतराव जगदाळे, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, निवृत्त पोलीस उपअधीक्षक शिवाजीराव फाटक, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत जिरंगे, गोकुळ जगदाळे, शिवसेना तालुकाप्रमुख सतिश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 


वृक्षारोपणाचा कार्यक्रम दिशादर्शक

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे काय होते याची झलक कोरोना संकटात पहायला मिळाली आहे. त्यामुळे वृक्षांचे महत्व समजून घेतले पाहिजे. निसर्गावर अतिक्रमण केल्याचे फटके निसर्ग देत असतो. अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन हे त्याचेच परिणाम आहेत. या पार्श्वभूमीवर हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम समाजासाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी यावेळी केले. 

बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी झाली आहे. त्यामुळे वृक्षारोपण व संवर्धनाच्या उपक्रमांना चळवळीचे स्वरूप येणे गरजेचे आहे. ज्या वृक्षातून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, निसर्गावर अवलंबून असणाऱ्या जीवांना खाण्यासाठी फळे मिळतात अशी झाडे प्राधान्याने लावली पाहिजेत, असे विचार वसंतराव जगदाळे यांनी मांडले.

नैसर्गिक आपत्तीतील मृतांना श्रध्दांजली

याप्रसंगी मधुकर शेंबडे, मारुती साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कमांडो अकॅडमी तसेच वडगाव हवेली येथील हरित ग्रूपच्या युवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास नितीन देसाई, महेंद्र संघवी, रवींद्र शहा, रजनीकांत शेंबडे, नंदकुमार पाटील, राजूनाना जगदाळे, संभाजी बर्गे, संभाजी कांबिरे, संजय जाधव, आनंदराव जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. निवृत्त पोलीस उपअधीक्षक दिलीप जगदाळे यांनी आभारप्रदर्शन केले. पत्रकार गजानन चेणगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या