Satara News : महाराष्ट्र अंनिसची जिल्हा कार्यकारिणी जाहीर


विलासराव भांदिर्गे, वंदना माने व अ‍ॅड. हौसेराव धुमाळ यांची एकमताने निवड

Satara News : महाराष्ट्र अंनिसच्या २०२१ - २२ या वर्षासाठी सातारा जिल्हा कार्यकारिणी निवडीची बैठक नुकतीच ऑनलाईन पार पडली. यामध्ये सातारा जिल्हाध्यक्षपदी तारळे येथील माजी मुख्याध्यापक विलासराव भांदिर्गे, जिल्हा कार्याध्यक्षपदी वंदना माने व जिल्हा प्रधान सचिव म्हणून अ‍ॅड. हौसेराव धुमाळ यांची एकमताने निवड करण्यात आली. 

बैठकीस राज्य निरीक्षक म्हणून म. अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य प्रशांत पोतदार व हमीद दाभोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत व अभिनंदन केले.

विविध विभागांच्या समित्यांचीही निवड 

सातारा जिल्ह्यातील कामाच्या वाढीच्या दृष्टीने म. अंनिसच्या विविध विभागांच्या समित्यांवर पुढीलप्रमाणे एकमताने निवड करण्यात आली. बुवाबाजी संघर्ष विभाग - सीताराम चाळके (कराड), मोहसीन शेख (रहिमतपूर), वार्तापत्र व प्रकाशन विभाग - प्रकाश खटावकर (सातारा), शिवाजी शिंदे (रहिमतपूर), वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प विभाग - सुभाष कळसे (वाई), महिला विभाग - अंकिता पवार (पिंपरी - रहिमतपूर), विविध उपक्रम - विकास तोडकर (सातारा), जात निर्मूलन व विवेकी जोडीदार निवड विभाग - तानाजी इंगळे (औंध), प्रमोद भिसे (वाई), मानसिक आरोग्य विभाग - राजेंद्र पवार (सातारा) युवा व विवेक वाहिनी विभाग - प्रशांत जाधव (औंध), सोशल मीडिया विभाग - हेमंत जाधव (कोरेगाव), रणवीर गायकवाड (वाई), प्रशिक्षण विभाग - सी. आर. बर्गे (कोरेगाव), कायदा विभाग - अ‍ॅड. मिलिंद पवार (सातारा), सांस्कृतिक विभाग - विजय पवार (सातारा).

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या