Satara News : महाबळेश्वर तालुक्यात तब्बल २० इंच पाऊस


रस्ते जलमय; चतुरबेट, उचाट पूल पाण्याखाली गेल्याने २८ गावांचा तुटला संपर्क 

Satara News : महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळत असून गेल्या २४ तासांमध्ये तब्बल २० इंच इतकी पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर तब्बल ११० इंच पावसाची नोंद झाली असून गुरुवारी दिवसभरात दहा इंचाहून अधिक पाऊस पडला असल्याचा अंदाज आहे. मुसळधार पाऊसाने सर्वच रस्ते जलमय झाले होते. 

महाबळेश्वर - पांचगणी मुख्य रस्त्यावर वेण्णा लेकनजिक पाणीच पाणी झाले आहे. रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वेण्णा लेक ते लिंगमला परिसरात सर्वत्रच पाणीच पाणी झाल्याचे चित्र होते. शेतीसह अनेकांच्या घरात व या परिसरातील हॉटेल, ढाब्यांमध्ये पाणी गेले होते. काही ठिकाणी संरक्षक भिंती लाईटचे खांब कोसल्याच्या घटनादेखील घडल्या.

अंबेनळी घाट झाला धोकादायक 

महाबळेश्वर - प्रतापगड रस्त्यावरील धबधबे ओसंडून वाहत असून घाटरस्त्यावर पाणीच पाणी होते. हा संपूर्ण रस्ताच धोकादायक झाला आहे. या घाटरस्त्यावर दरडी कोसळण्याची शक्यता आहे. महाबळेश्वर तालुक्यातील चतुरबेट व उचाट पूल पाण्याखाली गेल्याने २८ गावांचा संपर्क तुटला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या