Satara News : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या सचिवाच्या कुटुंबास मदत


सातारा जिल्हा बँकेच्या अधिकारी व सेवकांनी ठेवला समाजापुढे एक वेगळा आदर्श !

Satara News : कोरोनाविरोधातील लढाईत जावली तालुक्यातील सायगाव विकास सेवा सोसायटीचे जिल्हास्तरीय सचिव शिवाजी सर्जेराव जगताप यांचा कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू झाला. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेल्या आवाहनास अनुसरून बँकेतील तसेच जिल्हा केडरच्या सचिवांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते जगताप यांच्या कुटुंबीयांकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकारी - सेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबाना अभिप्रेत कृषी व सहकार क्षेत्रातील कार्य बँक आज तळमळीने व निष्ठेने करीत आहे. याची जाणीव ठेवून बँकेचे अधिकारी व सेवक यांनी आर्थिक मदत केलेली आहे, असे उद्गार आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी काढले.

जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब 

बँकिंग कामकाजाबरोबर जिल्ह्यातील विकासाभिमुख कामात सेवक हे नेहमीच अग्रेसर असून अशा दु:खद प्रसंगी अध्यक्षांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत ते जगताप कुटुंबियांच्या मदतीला धावले आहेत ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यावेळी म्हणाले. यावेळी जगताप कुटुंबीयांनी जिल्हा बँकेच्या अधिकारी - सेवकांनी केलेली मदत लाख मोलाची असल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे तसेच जिल्हा केडरचे अधिकारी मकरंद भोसले, लेखनिक जालिंदर पवार, तालुका सचिव रघुनाथ तळेकर उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या