Satara News : अ‍ॅड. गोविंद गांधी यांचे जयपूर येथे निधन


हिंदू महासभेचे उमदे नेतृत्व हरपले; बुधवारी साताऱ्यात अंत्यसंस्कार

Satara News : हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अ‍ॅड. गोविंद गांधी (वय ७२) यांचे सोमवारी राजस्थानात जयपूर येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. बुधवारी त्यांचे पार्थिव विमानाने मुंबईत व तेथून सातारला आणण्यात येणार असून त्यानंतर सातारा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  गांधी यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सातारा येथील शाहूपुरीत वैष्णोदेवी मंदिर परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तव्यास असणारे अ‍ॅड. गांधी कट्टर सावरकरवादी म्हणून सर्वत्र परिचित होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांच्या प्रचार - प्रसारासाठी देशात विविध भागात त्यांची भ्रमंती असे. हिंदू धर्माचा प्रचार, गोहत्याबंदी, देशभक्ती यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असे.

सातारा शहरवासीयांना धक्का

सध्या ते काही कामानिमित्त जयपूर दौऱ्यावर होते. काल त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्यामुळे जयपूरला कळवण्यात आल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता तेथील एका हॉटेलमधील खोलीत ते सापडले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सातारा शहरवासीयांना धक्का बसला. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये दु:खाची छाया पसरली. बुधवारी सकाळी अकरापर्यंत अ‍ॅड. गांधी यांचे पार्थिव सातारला आणण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या