कोरोना सेंटरमध्ये २५ टक्के ऑक्सिजन बेडची सुविधा देणार - डॉ. पवार
Satara News : जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) बंद करणार आहे. कोरोना सेंटरमध्ये एकूण बेडच्या २५ टक्के बेड ऑक्सिजन करणार आहे. दर्जात्मक आरोग्य सुविधा पुरवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येला निश्चितपणे आळा बसेल, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी व्यक्त केला.
जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. पवार यांनी विविध विषयावर संवाद साधला. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात बाधितांचे प्रमाण जास्त आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ट्रेसिंगवर भर दिला जात आहे. होम आयसोलेशनमुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याने आयासोलेशन बंद करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आकडेवारीसाठी कंट्रोल रूम
जिल्ह्यातील कोरोना सेंटरची संख्या वाढवून त्या ठिकाणी रुग्णांना उत्तम दर्जाच्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बाधित संख्या, मृत्यूंची संख्या ही आकडेवारी सुस्थितीत देण्यासाठी तालुकास्तर व जिल्हास्तरावरील कंट्रोल रुम अद्ययावत करणार आहे, असे सांगून, जिल्ह्यात आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
तिसNया लाटेची संभाव्य स्थिती लक्षात घेऊन उपाययोजनांवर भर दिला आहे. रुग्णांच्या चाचण्यांबाबत खासगी लॅबला तंबी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात रुग्ण शोधण्यासाठी ग्रामस्तरावर नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्राम दक्षता समित्या अधिक सक्षमपणे काम करण्याबाबतच्या सूचनाही दिल्या आहेत. आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील उपाययोजनांसाठी सक्रिय करणार आहे. जिल्ह्याला जास्तीत जास्त लस पुरवठ्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षण केंद्र अद्ययावत करणार
जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाNयांचे प्रशिक्षण घेण्यासाठी साताऱ्यात जिल्हा प्रशिक्षण केंद्र आहे. या ठिकाणी जिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. मात्र केंद्रात जागा व सोयी - सुविधा अपुऱ्या असल्याने पुढील काळात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन जिल्हा प्रशिक्षण केंद्र अद्ययावत करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या