Satara News : सलग दुसऱ्या वर्षी 'बोरीचा बार' नाही झाला


शिव्यांची लाखोली न वाहता केली सुख-शांती, समृध्दीसाठी देवीला प्रार्थना

Satara News : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बोरी व सुखेड ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला प्रतिसाद देत यावर्षीही 'बोरीचा बार' न भरविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बोरीचा बार भरला नाही. मात्र या दोन्ही गावांतील प्रत्येकी पाच महिलांनी दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत दोन्ही गावांच्या मध्ये असलेल्या ओढ्याकाठी येऊन प्रथेप्रमाणे पूजाअर्चा करत बोरीच्या बाराची प्रथा अखंडित सुरु ठेवली. मात्र कोणत्याही प्रकारच्या शिव्या शाप न देता गावच्या सुख, शांती, आरोग्य व समृद्धीची देवीकडे प्रार्थना केली.

कोरोनाच्या नियमांचे पालन करत दुपारी १२ वाजता बोरी व सुखेड येथील प्रत्येकी पाच महिलांनी गावातील ग्रामदैवताचे दर्शन घेऊन डफडे, सनई व तुतारी आदी वाद्यांच्या साथीने सुक्रोबा देवताची पूजा करुन तेथील माती बार भरतो त्या ओढ्यात आणून पाण्यात सोडून तेथील सत्य आईची पूजा केली. खण व नारळाने ओटी भरली. गावच्या आरोग्य व भल्यासाठी देवीकडे प्रार्थना केली.

धार्मिक निधी करुन परंपरा राखली 

गावावर कोणतेही वाईट संकट येऊ नये म्हणूनच बार भरतो. सलग दुसNया वर्षीही बार बंद असल्यामुळे खूप वाईट वाटप असल्याच्या भावना या दोन्ही गावांतील महिलांनी व्यक्त केल्या. मात्र 'बोरीच्या बारा'ची प्रथा अनेक वर्षाच्या परंपरेनुसार सलग दुसNया वर्षीही जुजबी धार्मिक निधी करुन एकही शिवी शाप न देता देवीकडे गावासाठी सुख, समृद्धी व आरोग्य देण्याची प्रार्थना करत अखंडित सुरु ठेवली गेली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या