पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी सराफ व्यावसायिक फरार; नातलगांची झाडाझडती
Satara News : केरळमधील सोने चोरी प्रकरणात अटकेत असणाऱ्या परेश अशोक आंबुर्ले उर्फ निखिल अशोक जोशी याने चोरीतील साडेसात किलो सोने साताऱ्यातील एका सराफाकडे वितळवल्याचे तपासात समोर आले आहे. तथापि, हा सराफ फरार झाला असून केरळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी केरळ पोलिसांनी मंगळवार तळे परिसरातील एका बंगल्यावर छापा टाकला. त्यावेळी संबंधित सराफाच्या नातलगांची त्यांनी चौकशी केली.
केरळमधील पलक्कड येथील मारुथारोड सहकारी ग्रामीण क्रेडिट सोसायटीमधून दि. २४ जुलैला सुमारे तीन कोटी रुपयांचे साडेसात किलो सोने चोरीस गेले होते. केरळच्या इतिहासातील सर्वात मोठी असलेल्या या चोरीचा तपास केरळ पोलिसांनी सुरु केला होता. कोणताही पुरावा, सुगावा नसतानाही केरळ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स यांची छाननी करत तपास नाशिकवर केंद्रित केला होता.
निखिल जोशीची साताऱ्यातून उचलबांगडी
या चोरीत नाशिक येथील निखिल उर्फ निक जोशी याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा पिच्छा पुरवला होता. केरळ पोलीस मागावर असल्यामुळे जोशी हा आपली ठिकाणे सतत बदलत होता. पण केरळ पोलिसांनी साताऱ्यातील बाँबे रेस्टॉरंट येथील एका हॉटेलमधून त्याची उचलबांगडी केली. यावेळी केरळ पोलिसांनी त्या ठिकाणी असणाऱ्या जोशी याच्या तीन साथीदारांनाही अटक केली होती.
केरळला नेल्यानंतर केलेल्या चौकशीत जोशीने चोरीतील सोने साताऱ्यातील एका सराफाच्या मदतीने वितळवल्याचे तसेच त्यानंतर ते एका डॉक्टरला विकल्याचे सांगितले होते. यानुसार केरळ पोलिसांनी पुन्हा साताऱ्यात येऊन त्या सराफाचा शोध सुरु केला. मात्र कारवाईच्या भीतीने त्याने घर कुलूपबंद करत पळ काढला होता. पळून गेलेल्या त्या सराफाचा आणि सोने विकत घेणाऱ्या डॉक्टरचा शोध केरळ पोलिसांकडून सातत्याने सुरु आहे. याच अनुषंगाने केरळ पोलिसांनी मंगळवार तळे परिसरात एका घरावर छापा टाकत सराफाच्या नातेवाइकांची कसून चौकशी केली.
Kerala Police In Satara
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या