Satara News : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी तासात जेरबंद Satara News


एलसीबीचा धडाका; फलटणमध्ये चोरीच्या पैशाच्या वाटणीवरून झाला होता खून

Satara News : फलटणमध्ये चोरीतील पैशाच्या वाटणीवरून रविवारी झालेल्या खून प्रकरणातील आरोपीस एका तासात गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई फत्ते केली. पप्या उर्पâ शूरवीर राजू पवार (वय २५, रा. सोमवार पेठ, फलटण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

रविवारी (दि. ८) सकाळी साडेअकराच्या सुमारास फलटण शहरातील सोमवार पेठेत खुनाची थरारक घटना घडली होती. चोरीच्या मालाच्या विक्रीतून आलेल्या पैशाच्या वाटणीच्या कारणातून राचुNया एकनाथ काळे (वय २९), रोशनी राचुNया काळे (वय २३, दोघे रा. बरड, ता. फलटण) व आरोपी पप्या उर्पâ शूरवीर राजू पवार यांच्यात वाद होऊन आरोपीने राचुNया काळे व रोशनी काळे यांच्यावर धारधार शस्त्राने वार करुन राचुन्या काळे याचा खून केला व रोशनी काळे हिस गंभीर जखमी करुन पळून गेला.

तांत्रिक पध्दतीने ठावठिकाणा शोधला

याबाबत सोमनाथ माणिक मोहिते (वय ३९, रा. सोमवार पेठ, फलटण) यांनी फलटण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखेच पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेनसार स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकाने गोपनीय बातमीदारामार्पâत तांत्रिक तपासपध्दतीचा वापर करुन आरोपीच्या ठावठिकाण्याबाबत माहिती प्राप्त केली व या गंभीर स्वरुपाच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस १ तासाच्या आत ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीकामी फलटण शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर धुमाळ, आनंदसिंग साबळे, पोलीस हवालदार संतोष पवार, पोलीस नाईक अर्जुन शिरतोडे, गणेश कापरे, प्रविण पवार, पोलीस कॉन्स्टेबल सचिन ससाणे, विशाल पवार, वैभव सावंत, संभाजी साळुंखे, विजय सावंत यांनी ही कारवाई केली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या