Satara News : आनंदराव भुसारी यांचे अल्प आजाराने निधन


गावकऱ्यांसाठी स्वतःची विहीर खुली करून देणारे दिलदार 'दादा' गेले

Satara News : कराड तालुक्यातील गोटेवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंदराव भैरू भुसारी (वय ६५) यांचे नुकतेच अल्प आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

आनंदराव भुसारी हे अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी त्यांनी स्वत:च्या विहिरीचे पाणी उदार अंत:करणाने दिले होते. विकास सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणूनही काही काळ त्यांनी काम पाहिले होते. मनमिळावू व प्रेमळ स्वभावामुळे सर्वांना त्यांच्याविषयी आदर वाटे. त्यांच्या पार्थिवावर लिंगायत धर्मप्रथेप्रमाणे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या