नागरिकांच्या जागरूकतेमुळे व पोलिसांच्या तत्परतेमुळे जेरबंद करण्यात यश
Satara News : कराड तालुक्यातील उंब्रज गावच्या हद्दीत उंब्रज पोलीस ठाण्याच्या पथकाने सराईत दुचाकी चोरट्यास शिताफीने पकडून त्याच्याकडून चोरीची अॅक्टिव्हा गाडी जप्त केली. संभाजी बबन जाधव (वय ३६, रा. अतित, ता. जि. सातारा) असे संशयिताचे नाव असून त्याच्याविरूध्द वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
गणेश तानाजी शिंदे (रा. उंब्रज) यांची पांढऱ्या रंगाची अॅक्टिव्हा (एमएच ५० एच २९१४) ही एक इसम चोरुन नेत असल्याबाबत नागरिकांनी उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना फोनद्वारे कळवले. त्यानुसार अजय गोरड यांनी पोलीस कर्मचारी आसिफ जमादार व टीम यांना त्या मोटार सायकल चोरट्यास ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. उंब्रज गावातील नागरिकांच्या सहाय्याने पोलीस नाईक आसिफ जमादार यांनी कोर्टी येथे त्या मोटार सायकल चोरट्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीची अॅक्टिव्हा गाडी जप्त केली.
उंब्रज पोलिसांची चपळ कामगिरी
जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस नाईक आसिफ जमादार, पोलीस कॉन्स्टेबल पृथ्वीराज जाधव, पोलीस कॉन्स्टेबल श्रीधर माने यांनी ही कारवाई केली.
पार्किंग करताना काळजी घ्या !
आपले वाहन पार्किंग करताना हँडल लॉक करुनच पार्वâ करावे. रात्रीच्या वेळी घरासमोर गाडी पार्क करताना शक्यतो साखळीचा वापर करुन गाडी लॉक करावी. आपल्या आसपास संशयित वाहन दिसून आल्यास उंब्रज पोलीस ठाण्याशी ९६२३९६१००० या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.
- अजय गोरड, सहाय्यक पोलीस निरीक्षक
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या