माय लॅबचे संस्थापक हसमुख रावलना आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार
Satara News : उपेक्षित, वंचितांसाठी आपली हयात वेचणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने यंदाचा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार आणि आरोग्य सेवेत क्रांती करणारे माय लॅबचे संस्थापक हसमुख रावल यांना आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पुरस्कार वितरण सोहळा होणार नसून पुरस्कारार्थींना त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी जावून सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली.
कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ गेल्या पंचवीस वर्षापासून 'आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार' प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे यंदाचे पंचवीसावे वर्ष आहे. १ लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रेरणा पुरस्काराचे यंदाचे सहावे वर्ष असून ५१ हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
आरटीपीसीआर टेस्ट किटची निर्मिती
डॉ. बाबा आढाव यांनी कष्टकNयांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या प्रती केलेल्या कार्याचा उचित गौरव व्हावा या भावनेतून त्यांना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हसमुख रावल यांनी सर्वसामान्यांना उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविण्याच्या ध्यासातून केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासोबत देशातील पहिल्या स्वदेशी कोविड १९ आरटीपीसीआर टेस्ट किटची यशस्वी निर्मिती करुन या बिकट परिस्थितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या या कार्याचा आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
यंदाच्या पुरस्कार्थींची निवड करण्यासाठी प्रा. संभाजीराव पाटणे, प्रा. वसंतराव जगताप, अनिल जोशी, उपराकार लक्ष्मण माने, प्रल्हादराव चव्हाण, प्रा. रमेश डुबल आणि प्रताप देशमुख यांची समिती करण्यात आली होती. या समितीने एकमताने केलेली शिफारस संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने स्वीकारण्यात आल्याचेही भोसले यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या