भक्त निवाससह अन्य विकासकामांसाठी लवकरच मिळणार निधी - मंगेश धुमाळ
Satara News : कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथील श्री सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थानसाठी 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा ८ कोटी ९४ लाख रुपयांचा विकास आराखडा सातारा जिल्हा परिषदेने तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी ग्रामविकास विभागाकडे पाठवण्यात आला असून लवकरच हा निधी मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी दिली.
कोरेगाव - वाई - खंडाळा तालुक्यांच्या सीमेवर हे देवस्थान असून या देवस्थानास शासनाने 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती नंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अनेक कामे मार्गी लागली आहेत. त्यांच्या माध्यमातून देवस्थानचा कायापालट होत आहे. या ठिकाणी दर शनिवारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शनिभक्तांचा मेळा भरत असून त्यांच्या निवासाची व्यवस्था नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे भक्त निवासासह परिसरात भाविकांसाठी सोयी सुविधा निर्माण व्हाव्यात, अशी भाविकांची सातत्याने मागणी होत होती.
भक्त निवासामुळे पर्यटनाला चालना
भक्त निवास उभे राहिल्यास येथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून त्यामुळे सोळशी व परिसराच्या पर्यटनदृष्ट्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे देवस्थानचे मठाधिपती नंदगिरी महाराज, मुंबई बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळस्कर, प्रमोद सोळस्कर पाठपुरावा करत होेते. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत याठिकाणी भक्तनिवास इमारत व इतर बांधकामासाठी ८ कोटी ९४ लाखांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून तो प्रस्ताव सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यामार्पâत शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून हा निधी लवकरच मिळणार आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शनैश्वर देवस्थान परिसरात मुलभूत सुविधा पुरवण्यात येत असून आगामी काळातही भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मंगेश धुमाळ यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या