Satara News : सातारा जिल्ह्यात फिरत्या लोकअदालतीचे आयोजन


'न्याय आपल्या दारी' संकल्पनेअंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये वाहन फिरणार
   

Satara News : सातारा जिल्ह्यामध्ये दि. ९ ते ३० ऑगस्ट या कालावधीमध्ये फिरत्या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून या फिरत्या लोकअदालतीकरिता निवृत्त न्यायाधीश राजेपांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या फिरते लोकअदालत वाहनाचे पूजन निवृत्त न्यायाधीश राजेपांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डायसचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव एस. बी. देसाई यांनी दिली.

या उद्घाटनप्रसंगी सर्व जिल्हा न्यायाधीश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि कनिष्ठ न्यायाधीश तसेच वकील संघाचे अध्यक्ष अरुण खोत, जिल्हा न्यायालयाचे व्यवस्थापक काळे, प्रभारी प्रबंधक जोशी, विधीज्ञ, विधी स्वयंसेवक आणि कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून फिरते लोकअदालत वाहन कोरेगावकडे रवाना करण्यात आले.

विधी साक्षरता शिबिरेही होणार

हे फिरते लोकअदालत वाहन ९ तालुक्यात फिरणार असून तडजोडी आधारे गावात जावून प्रकरणे निकाली करणार आहेत. यामध्ये दि. ९ ऑगस्ट २०२१ रोजी तडवळे (ता. कोरेगाव), दि. ११ रोजी गुरसाळे (ता. खटाव), दि. १४ रोजी मोगराळे (ता. माण), दि. १७ रोजी खुटबाब (ता. माण), दि. १९ रोजी जाधववाडी (ता. फलटण), दि. २१ रोजी अंदोरी (ता. खंडाळा), दि. २४ रोजी सुरुर (ता. वाई), दि. २६ रोजी सरताळे (ता. जावली), दि. ३० रोजी मसूर (ता. कराड) या ठिकाणी विधी साक्षरता शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १० ऑगस्ट रोजी कोरेगाव, दि. १२ रोजी खटाव, दि. १३ रोजी वावरहिरे (ता. माण), दि. १८ रोजी विडणी (ता. फलटण), दि. २० रोजी खेड (ता. खंडाळा), दि. २३ रोजी केंजळ (ता. वाई), दि. २५ रोजी कुडाळ (ता. जावली) आणि दि. २७ ऑगस्ट रोजी उंडाळे (ता. कराड) या ठिकाणी 'न्याय आपल्या दारी' या संकल्पनेच्या माध्यमातून फिरत्या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रकरणे निकाली काढण्यासाठी आवाहन

नागरिकांनी आपली प्रकरणे फिरत्या लोकअदालतीमध्ये ठेवून तडजोडीने निकाली करावीत, असे आवाहन वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव एस. बी. देसाई यांनी केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या