संतप्त शिवसैनिक उतरले रस्त्यावर; मोर्चे, निदर्शने, जोडे मारो आंदोलनांनी वातावरण तापले
Satara News : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी अशोभनीय व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे सातारा जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटले. सातारा, कराड, फलटण, महाबळेश्वरसह जिल्हाभर रस्त्यावर उतरून शिवसैनिकांनी राणेंचा धिक्कार केला. 'कोंबडीचोर... कोंबडीचोर... नारायण राणे कोंबडीचोर' अशा घोषणा देत शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली.
सातारा शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मोती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चक्क कोंबड्या हातात घेऊन निषेध मोर्चा काढला. यावेळी जोरदार घोषणा देत राणेंच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात जिल्हा उपप्रमुख सचिन मोहिते, तालुकाप्रमुख आतिश ननावरे, अनिल गुजर, तालुका उपप्रमुख रमेश बोराटे, शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, निलेश मोरे, शिवाजीराव इंगवले, सयाजी शिंदे, नितीन लकेरी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले होते.
कराडमध्ये तीव्र निदर्शने
कराडमध्ये शिवसेना व महिला आघाडीच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच राणेंवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन कराडच्या तहसिलदारांना देण्यात आले. कराड बसस्थानक परिसरात कराड शहर शिवसेनेतर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलनात रामभाऊ रैनाक, माजी जिल्हाप्रमुख संजय मोहिते, यावेळी कराड शहरप्रमुख शशिराज करपे, माजी तालुकाप्रमुख रामभाऊ खंडागळे, तात्यासाहेब घाडगे, शहर उपप्रमुख अक्षय गवळी, विभागप्रमुख महेश पवार, बाळासाहेब वसगडेकर, आशुतोष मोहिते, कृष्णा जगदाळे, शाखाप्रमुख सोमनाथ कुंभार, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश बडेकर, आनंदयात्री रिक्षा युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महाबळेश्वरमध्ये निषेध मोर्चा
फलटण येथे शिवसेनेच्या वतीने, नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस व प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली. दहिवडी, वडूज येथेही तीव्र आंदोलन छेडण्यात आले. महाबळेश्वर येथे निषेध मोर्चा काढून राणेंचा धिक्कार करण्यात आला. या आंदोलनात राजाभाऊ गुजर, शहरप्रमुख सुनील साळुंखे, युवासेना शहरप्रमुख आकाश साळुंखे, आनंद धनावडे, अंकुश जाधव, राजू पंडित, अशोक ढेबे, शंकर ढेबे, आबा पारठे, रवी चिकणे, उस्मान खारकंडे, शाहनवाझ खारकंडे, विशाल सुतार, राजू सोंडकर, आकाश ढेबे, प्रवीण जिमन, चंद्रकांत पांचाळ आदी सहभागी झाले होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या