Satara News : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस जखमी


पुढील उपचारासाठी पुण्याच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाकडे रवानगी

Satara News :  रहिमतपूर ते कोरेगाव मार्गावर निगडी (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस गंभीर जखमी झाले. निसर्गमित्र आकाश राऊत व व्यंकटेश शेट्टी यांनी तात्काळ वन विभाग बचाव दलाच्या मदतीने जखमी तरसावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याची पुणे येथील राजीव गांधी प्राणी अनाथालयात रवानगी केली.

रहिमतपूर ते कोरेगाव मार्गावरील ओढ्यावगळी व आडमार्गांवर परिसरातील हॉटेल्स, ढाबाचालकांनी उघड्यावर टाकलेले खरकटे अन्न तसेच कुक्कुटपालन, चिकन सेंटरवरील फेकलेल्या मांसाहारी टाकाऊ पदार्थांच्या दुर्गंधीमुळे ते खाण्यासाठी रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांप्रमाणेच दोन तरसांचा परिसरात वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्राणीमित्रांकडून प्राथमिक उपचार

सासुर्वे फाटा ते निगडी दरम्यान रात्री अज्ञात भरधाव वाहनाने एका तरसाला ठोकर दिली. गंभीर जखमी तरस झाडीत निपचिप पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या नजरेस पडले. त्यांनी ही घटना रवी पवार यांना सांगितली. त्यांनी रहिमतपूर येथील आकाश राऊत व वाठार किरोली येथील व्यंकटेश शेट्टी यांना कळविले. त्यानी लगेच कोरेगाव वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांना याविषयी माहिती दिली. 

या सर्वांनी तरसाला कोणत्याही प्रकारची इजा न होता पकडले व पुढील उपचारासाठी त्याची पुणे येथील राजीव गांधी प्राणी अनाथालयात रवानगी केली. पुणे येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे राजन शिर्वेâ, राजेंद्र परदेशी यांनी तरसाच्या पाठीच्या हाडास गंभीर इजा झाल्याचे सांगितले. याकामी कोरेगावचे वनक्षेत्रपाल वैभव घार्गे, वनरक्षक रोहित लोहार यांनी विशेष प्रयत्न केले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या