Satara News : आसरेतील शासकीय जागांचा बेकायदा ‘बाजार’ ?


धोम प्रकल्पग्रस्त समितीच्या अध्यक्षांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

Satara News : धोम प्रकल्पग्रस्त समितीच्या अध्यक्षांनी आसरे (ता. कोरेगाव) येथील शासकीय सार्वजनिक खुल्या जागा काही लोकांना नोंदणीकृत दस्ताने बेकायदेशीररित्या विक्री केली आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रुपेश सपकाळ यांच्यासह ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केली.

सबंधितांनी प्रकल्पग्रस्त म्हणून शासनाची फसवणूक करुन बेकायदेशीर जमीन बळकावली आहे. त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात तक्रार अर्ज करण्यात आला आहे. तसेच आसरे (ता. कोरेगाव) येथे जादा भूखंड मिळवले आहेत. कुटुंबातील सदस्यांनी सरपंचपदाचा गैरवापर करुन भूखंडाच्या ग्रामपंचायत नोंदीत मंजूर आदेशापेक्षा जादा जागेची नोंद केली आहे. ही नोंद कमी करण्यासंदर्भात गटविकास अधिकाNयांनाही पत्रव्यवहार केला आहे. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

पदाचा गैरवापर करून खोट्या नोंदी

संबंधितांच्या कुटुंबातील सदस्यांनी सरपंचपदाचा गैरवापर करत गावातील खेळासाठी राखीव असलेल्या शासकीय जागेची नोंद ग्रामपंचायत दप्तरी कुटुंबीय पदाधिकारी असलेल्या एका ट्रस्टच्या नावे बेकायदेशीररित्या केली आहे. यामध्ये जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे रुपेश सपकाळ, महेंद्र सणस, धर्मेंद्र सणस, लक्ष्मण सणस, रामचंद्र सणस, अनिल सणस यांनी म्हटले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या