Satara News : विजय उत्तुरे यांना ‘गुंफण सामाजिक पुरस्कार’ प्रदान


वाचनसंस्कृतीसाठी गुंफण अकादमीने दिलेले योगदान भूषणावह - न्या. वेदपाठक

Satara News : साहित्याचे मोठेपण चिरकाल राहण्यासाठी वाचनसंस्कृती टिकवणे गरजेचे असून त्याचवेळी समाजासाठी उदात्त भावनेने विधायक काम करणाऱ्यांचा सन्मानही केला गेला पाहिजे. गुंफण अकादमीने त्यासाठी दिलेले योगदान भूषणावह आहे, असे उद्गार प्रसिध्द साहित्यिक व पुण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधिश सुनील वेदपाठक यांनी काढले.

साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे सातारा जिल्ह्यातील अग्रगण्य व्यासपीठ अशी ओळख असलेल्या गुंफण अकादमीच्या वतीने देण्यात येणारा 'गुंफण सामाजिक पुरस्कार' पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय उत्तुरे यांना न्या. वेदपाठक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रसिध्द ग्रामीण कथाकार बबन पोतदार, अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, सचिव गजानन चेणगे, चित्रपट निर्माते धनंजय चौधरी आदी उपस्थित होते.

साहित्यात लोकजीवन घडवण्याचे सामर्थ्य 

विजय उत्तुरे यांनी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना न्या. वेदपाठक यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. साहित्यात ज्याप्रमाणे लोकजीवनाचे प्रतिबिंब उमटत असते, त्याप्रमाणे लोकजीवन घडवण्याचे सामर्थ्यही साहित्यात असते, असे प्रतिपादन बबन पोतदार यांनी केले.

आदर्श समाजनिर्मितीसाठी झटणाऱ्यांना प्रेरणा 

विविध क्षेत्रात चांगले काम करणारे लोक आपापल्या परीने आदर्श समाजनिर्मितीसाठी झटत असतात. त्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने अकादमी अशा लोकांना सन्मानित करत असते, अशी माहिती डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी यावेळी दिली. अनिकेत चेणगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या