Satara News : राज्य खो - खो स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड


फलटणच्या निखिल विचारेची कर्णधारपदी निवड; व्यवस्थापकपदी प्रथमेश जाधव

Satara News : धाराशिव येथे २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या ४७ व्या राज्य अजिंक्यपद खो - खो स्पर्धेसाठी सातारा जिल्हा संघ निवडण्याकरिता निवड चाचणी स्पर्धा नुकतीच कराड तालुक्यातील कवठे (मसूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर झाली. 

सातारा जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव महेंद्र गाढवे व राज्य क्रीडा प्रशिक्षक मनोहर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, क्रीडा प्रशिक्षक प्रदीप बंडगर, प्रशांत कदम, अनिकेत मोरे, मयूर साबळे, शशिकांत गाढवे, ज्ञानेश्वर जांभळे, दिलीप माने यांच्या उपस्थितीत निवड चाचणी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. 

जिल्ह्याचा संघ अजिंक्यपदापर्यंत पोहोचेल !

सातारा जिल्हा खो-खो वर प्रेम करणारा जिल्हा असून निवडलेला संघ अजिंक्यपदापर्यंत नक्कीच पोहोचेल, असा विश्वास असोसिएशनचे सचिव महेंद्र गाढवे यांनी व्यक्त केला. सातारा जिल्हा नेहमीप्रमाणेच यावेळीही आघाडीवर राहील अशी अपेक्षा मनोहर यादव यांनी व्यक्त केली. यावेळी कासम पटेल, गोल्डन पवार, उपसरपंच गणेश घार्गे, खराडे क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव, सुनील जाधव, संजय जाधव, किरण जाधव, विनोद रसाळ, प्रवीण कांबिरे उपस्थित होते. 

मान्यवरांचे स्वागत गणेश घार्गे, दादासो साळुंखे, सुभाष साळुंखे, नारायण जाधव, प्रकाश चव्हाण, सतीश कळसकर, शशिकांत चव्हाण, ऋषिकेश यादव यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक दिलीप माने यांनी केले, तर क्रीडाशिक्षक प्रदीप बंडगर यांनी आभार मानले. दरम्यान, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक - निंबाळकर व जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.

राज्य स्पर्धेसाठी निवडलेला संघ 

निखिल विचारे - कर्णधार (मुधोजी हायस्कूल, फलटण), गणेश रजपूत (दादासाहेब चव्हाण कॉलेज, माळवाडी), संग्राम कांबिरे (वायसी कॉलेज, कराड), जयराज कचरे (आयटीआय, कराड), हरिओम शेलार, वरूण गाढवे (शिवप्रतिष्ठान, खंडाळा), केदार माने, ओंकार मासाळ (ओगलेवाडी स्पोर्टस् क्लब), विजय चव्हाण (संघर्ष क्लब, कवठे), प्रतीक जगताप, साहिल गुजर, अथर्व भोसले (स्वराज्य, सोनवडी-गजवडी), राखीव खेळाडू - आदित्य साळुंखे (संघर्ष क्लब, कवठे), संस्कार थोरात (संतोष जाधव क्रीडा मंडळ, खराडे), तन्मय शिंदे (ओगलेवाडी स्पोर्टस् क्लब). संघ व्यवस्थापकपदी प्रथमेश जाधव, तर प्रशिक्षक म्हणून ओमकार कदम यांची निवड करण्यात आली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या