Satara News : 'कराड जनता'च्या कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा


अवसायकांचा मनमानीपणा, बोगस कर्जप्रकरणांमुळे पिचलेल्यांचा उद्रेक

Satara News : कराड जनता सहकारी बँकेचे अवसायक मनोहर माळी यांचा मनमानी कारभार आणि कर्मचाऱ्यांच्या बोगस कर्ज प्रकरणांच्या तपासात होणारी टाळाटाळ थांबवून न्याय मिळावा यासाठी बॅंकेचे कर्मचारी १५ ऑगस्टपासून कराड तहसिलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. 

कराड जनता बँकेच्या २०१५ पासूनच्या संचालक मंडळाने मनमानी करुन सेवकांची वार्षिक वेतनवाढ रोखली होती. मात्र ती अवसायक मनोहर माळी यांनी मनमानी करून काही सेवकांनाच फरकासह दिली आहे. ती सरसकट मिळाली पाहिजे.

अर्ज देऊनही ठेवीदारांची अडवणूक

सेवकांच्या पाच लाखांच्या आतील ठेवी परत मिळण्यासाठी योग्य ते अर्ज भरुन दिले आहेत. विमा कायद्यांतर्गत त्याला मंजुरी आहे, मात्र अवसायक मनमानी करुन त्या ठेवी परत देत नाहीत. त्या ठेवी परत मिळाव्यात. सेवकांचे हक्क रजेचे पगार अवसायकांनी काही ठराविक सेवकांना दिले आहेत. ते सर्वांनाच द्यावेत.

कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्जे

सेवकांकडे कर्ज फेडल्याचे ना हरकत दाखले आहेत. तरीही अवसायक त्यांच्याकडून मनमानी वसुली करत आहेत. नोटीसा पाठवत आहेत. वास्तविक त्याबाबत फौजदारी न्यायालयात दावा दाखल आहे. त्याच्या तपासाचे आदेश देत न्यायालयाने अहवाल मागवला आहे. मात्र पोलीस तपासही करत नाहीत व अहवाल देत नाहीत. त्यामुळे त्यात स्वतंत्र गुन्हा नोंद करुन अहवाल द्यावा. न्यायालयात फिर्याद देण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडेही चौकशीची मागणी केली होती. त्याची दखल घेतली गेली नाही. न्यायालयात दाखल फिर्यादीत तत्कालीन संचालक मंडळासह बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावावर ४ कोटी ६२ लाख ८७ हजार रूपये दबाव टाकून उचलले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल व्हावा, त्या सगळ्यांचीच सखोल चौकशी व्हावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

आदेश असुनही कार्यवाही नाही

फिर्यादीनुसार पोलिसांना कर्मचाऱ्यांच्या कर्जप्रकरणात तपासाचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही होत नाही. त्यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागतो आहे. त्या सगळ्यात शासनाने लक्ष घालावे आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा यासाठी उपोषणाशिवाय पर्याय नाही.उपोषणात जनता बँकेच्या स्वेच्छा निवृत्तीसह राजीनामा दिलेल्या व निवृत्त कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

पीडित कर्मचाऱ्यांच्या वतीने १५ ऑगस्टपासून कराड तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण होणार आहे. कोविडचे नियम पाळून कर्मचाऱ्यांतर्फे पाच व्यक्ती सामाजिक अंतर ठेवून उपोषणास बसणार आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या