Satara News : शिवसेना उतरणार जिल्हा बँकेच्या रणांगणात !


समविचारी लोकांची भूमिका पाहून रणनीती ठरवणार : बानगुडे - पाटील

Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक शिवसेना लढणार असल्याचे सूतोवाच शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे - पाटील यांनी केले. जिल्ह्यातील सद्यस्थिती व काँग्रेससह इतर समविचारी लोकांची भूमिका यावर आगामी रणनिती ठरविण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल नुकतेच वाजले आहे. याअनुषंगाने येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, धैर्यशील कदम, शेखर गोरे, डी. एम. बावळेकर इत्यादी उपस्थित होते.

बैठकीत निवडणुकीसंदर्भात आढावा

बैठकीत मतदारसंघनिहाय सविस्तर चर्चा करण्यात आली व निवडणुकीसंदर्भात पूर्णपणे आढावा घेण्यात आला. तसेच कच्ची मतदार यादी, उमेदवारांची वर्गवारी यासंदर्भात सखोल चर्चा करुन आपापल्या मतदारसंघात व कार्यक्षेत्रात कशा पध्दतीने निवडणुकीच्या कामाला लागावे याविषयी चर्चा झाली. 

लवकरच वरिष्ठांसोबत बैठक

लवकरच निवडणुकीचा ठोस आराखडा तयार करुन मुंबईमध्ये वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक आयोजित केली जाणार आहे. बैठकीतून पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली शिवसेनेची निवडणुकीची भूमिका व लढविणाऱ्या जागा यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती बानुगडे - पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या