Satara News : सातारा जिल्हा बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीत


कोरोनामुळे प्रत्येकाच्या जीवनशैलीत व अर्थचक्रातही बदल - रामराजे

Satara News : कोरोनामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैलीत बदल झालेला असून अर्थचक्रातही बदल झालेला आहे. त्यामुळे बँक, विकास संस्था - कारखाने यांनीही कोरोनाला न घाबरता त्यावर मात करत आपल्या कार्यपध्दतीत बदल करुन गुणात्मक व दर्जात्मक काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ७१ वी वार्षिक साधारण सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यालय व तालुक्यांच्या विभागीय कार्यालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात झाली. याप्रसंगी ते बोलत होते. सभेस बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, आमदार शशिकांत शिंदे, विक्रमसिंह पाटणकर, आमदार मकरंद पाटील, दत्तात्रय ढमाळ, राजेंद्र राजपुरे, नितीन पाटील, शिवरुपराजे निंबाळकर - खर्डेकर, राजेश पाटील - वाठारकर, अनिल देसाई, प्रदिप विधाते, प्रकाश बडेकर, अर्जुनराव खाडे, सुरेखा पाटील, कांचन साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा बँकेकडून लोकहिताचे काम

जिल्हा बँकेच्या इतिहासात अनेक अडचणी व प्रसंग आले, तरीसुध्दा बँक सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे. कोरोनाची परिस्थिती असुनही बँकेने गुणात्मक व दर्जात्मक काम केले आहे. बँकेने कोरोना संकटकाळात शासनास आर्थिक मदत, शेतकरी सभासद / शेतमजूर यांना जीवनावश्यक अन्नधान्याचे कीट तसेच कोविड बाधित रुग्णांना उपचारासाठी मदत व्हावी म्हणून शासकीय रुग्णालयांना वैद्यकीय यंत्रसामुग्री उपलब्ध करुन दिली आहे. शासनाच्या कर्जमाफीचा शेतकरी सभासदांबरोबरच बँकांनाही लाभ झाला आहे. कारण बँकांचे कर्ज वसुलीचे प्रमाण वाढले. साखर कारखान्यांना पुरेसा व आवश्यक वित्त पुरवठा करण्याची जबाबदारी जिल्हा बँकांची असून त्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. विकास संस्था या जिल्हा बँकांचा प्रमुख घटक असल्याने या संस्था सक्षम करण्यासाठी तळागाळातील विकास संस्थांना सहकार्य केले पाहिजे, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यावेळी म्हणाले.

सर्व विषयांना एकमताने मंजुरी 

बँकेचे अध्यक्ष, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी बँकेच्या अहवाल सालातील कामाचा, प्रगतीचा आलेख सभेसमोर विषद केला व संकल्पपूर्तीची, भावी संकल्पांची माहिती दिली. डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी स्वागत व वार्षिक साधारण सभेच्या विषयांचे वाचन केले. त्या अनुषंगाने सांगोपांग चर्चा होवून सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. विकास संस्थांच्या सभासदांनी विविध कर्ज योजना व कामकाजाच्या अनुषंगाने असलेल्या अडीअडचणीसंबंधी प्रश्न सभेत मांडले तसेच काही सूचना केल्या.  सभेत समाजाशी, सहकार चळवळीशी तसेच बँकेशी बांधिलकी असणाऱ्या दिवंगत मान्यवर, कार्यकर्ते, बँकेचे आजी - माजी सेवक, शहीद जवान आदिंना श्रध्दांजली वाहण्यात आली. बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने यांनी आभार मानले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या