Satara News : जिल्हा प्रशासनाने मानले एनडीआरएफचे आभार


पाटण, जावली, वाईतील आपत्तीत केलेल्या मदतकार्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

Satara News : अतिवृष्टीमुळे कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर व जावली या तालुक्यात पूरपरिस्थिती तसेच भूस्खलन होऊन आणि दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. या आपत्तीच्या काळात एनडीआरएफच्या पथकांमार्फत अतिशय बहुमूल्य स्वरुपाची मदत झाल्याबद्दल जिल्हा प्रशासनाने पुणे येथील ०५ बटालियनचे कमांडंट अनुपम श्रीवास्तव यांचे आभार मानले आहेत. या आभाराचे पत्र जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी दिले.

याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे आदी उपस्थित होते. पाटण तालुक्यातील मिरगाव, ढोकावळे, आंबेघर तर्पâ मरळी तसेच जावली तालुक्यातील रेंगडी आणि वाई तालुक्यातील जोर व कोंढावळे या गावांमध्ये भूस्खलन होऊन जीवित व वित्तहानी झाली होती. या ठिकाणी पुणे येथील एनडीआरएफच्या पथकांमार्पâत तात्काळ शोध व बचाव आणि मदत कार्य पार पडून या ठिकाणच्या नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. तसेच मृत व्यक्तींचा शोध घेण्याचे काम हे अत्यंत कमी कालावधीत पार पडले. आपत्तीच्या कालावधीत एनडीआरएफच्या पथकांमार्फत बहुमुल्य स्वरुपाची मदत झालेली आहे, त्याबद्दल जिल्हा प्रशासनातर्पेâ आभाराचे पत्र जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते देण्यात आले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या