Satara News : कराडमध्ये २० हजाराच्या लाचप्रकरणी सर्कल अडकला


तक्रारदाराच्या प्लॉटची तलाठ्यांनी धरलेली नोंद प्रमाणित करण्यासाठी मागितली लाच

Satara News : तक्रारदाराने खरेदी केलेल्या गुठेवारी प्लॉटची तलाठ्यांनी धरलेली नोंद प्रमाणित करण्यासाठी २० हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी कराड येथील मंडल अधिकारी नागेश निकम याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित मंडल अधिकाऱ्याने या प्रकरणात २७ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. तथापि, तडजोडीअंती २० हजार रूपये घेऊन काम करण्याचे ठरले होते. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली. तसेच कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सांगली युनिटची कामगिरी

सापळा पथकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली युनिटमधील पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय संकपाळ, पोलीस नाईक धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, पोलीस कॉन्स्टेबल अजित पाटील, वीणा जाधव, चालक पोलीस नाईक बाळासाहेब पवार यांचा सहभाग होता.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या